शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सख्या मामाने ९ वर्षाच्या भाचीवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 21:35 IST

९ वर्षाची असलेल्या पिडीत मुलीने धाडसाने १०० नंबरवर पोलीसांना फोन करत आपबीती सांगितली. पोलिसांनीही तातडीने दखल घेत आरोपी मामाला अटक केली. नात्याला काळीमा फासणा-या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुणे (मंचर) : आंबेगाव तालुक्यातील  पेठ येथे सख्या मामाने आपल्या अल्पवयीन भाचीवर जबरदस्ती करून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ९ वर्षाची असलेल्या पिडीत मुलीने धाडसाने १०० नंबरवर पोलीसांना फोन करत आपबीती सांगितली. पोलिसांनीही तातडीने दखल घेत आरोपी मामाला अटक केली. नात्याला काळीमा फासणा-या घटनेने खळबळ उडाली आहे.मंचरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  ९ वर्षाच्या अल्पवयीन पीडीत मुलगी आणि तीचा ४ वर्षांचा भाऊ आई सोडून गेल्याने आपल्या आजी आजोबांकडे राहत होते. वडील पुण्यात मजुरीचे काम करतात. आई वडील येथे नसल्याने आजी आजोबा दोघांच पालन पोषण करत होते. आजी आजोबा दिवसभर शेतात काम करत होते. आरोपी मामा दुपारच्या वेळी कोणी घरी नसताना  भाचीवर बलात्कार करत होता. एक महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मध्यंतरी मुलीचे पोट या कारणाने दुखत होते. या मामाने तिला स्थानिक डॉक्टरकडे नेले. कुणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी भीतीने गप्प राहिली.  कुणाचा आधार नसल्याने ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मामाने ४ वेळा घरी कोणी नसताना असा प्रकार केला. १२ डिसेंबरला घरात लहान भाऊ झोपला असताना मामाने बलात्कार केला.घाबरलेल्या मुलीने रविवारी (दि २२) आजोबांचा फोन घरी राहिला हे पाहिले. धाडस करून या मुलीने मोबाईलवरून १०० नंबर डायल करत पोलिसांना संपर्क केला, आणि अत्याचाराला वाचा फोडली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी ताबडतोब या घटनेची दखल घेत, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, विठ्ठल वाघ, नवनाथ नाईकडे, विशाल चितारे, रामदास तनपुरे यांनी या नराधम मामाला अटक केली. न्यायालयाने आरोपीस २७ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. नात्याला काळीमा फासणा-या या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. पोलीस उप निरीक्षक अर्जुन शिंदे पुढील तपास करीत आहेत.मंचर पोलीस ठाणे मार्फत एक महिन्यापासून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस नाईक विनोद गायकवाड हे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जाऊन मार्गदर्शन करत आहे. मार्गदर्शन करताना ते त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व पोलीस स्टेशनचा नंबर देतात.जर कोणी त्रास देत असेल तर फोन करून आम्हाला कळवा असे आवाहन ते करत आहे. यामुळेच या छोट्याशा मुलीने शंभर नंबर फिरवून आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा पोलिसांपर्यंत पोहोचवली असेल अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारMancharमंचरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस