शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

मराठी लेखन नियमांबाबत अनिश्चितता

By admin | Published: August 30, 2016 12:59 AM

भाषेचे काम हे वर्षानुवर्षे चालते. ती काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनीच ठणकावून सांगत महामंडळाने मराठी लेखनाचे सुधारित नियम करण्याचे हाती

पुणे : भाषेचे काम हे वर्षानुवर्षे चालते. ती काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनीच ठणकावून सांगत महामंडळाने मराठी लेखनाचे सुधारित नियम करण्याचे हाती घेतलेले काम आठ वर्षांपासून भिजत पडले असल्याचे एकप्रकारे समर्थनच करून, पूर्णतेच्या कालावधीबाबतची अनिश्चितताच जणू स्पष्ट केली. साहित्य महामंडळाने १९६२मध्ये मराठी भाषेबाबतचे नियम प्रसिद्ध केले होते जे आजही प्रचलित आहेत. परंतु महामंडळाच्या मराठीबाबतच्या नियमात अनेक त्रुटी व विसंगती असल्याने या संदर्भात अनेक तक्रारी व सूचना आल्या होत्या. प्रमाण मराठी कोणती, शुद्ध-अशुद्ध लेखन, प्रमाण मराठी कशी लिहावी व ती कशी बोलावी या विविध नियमांसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे असताना सात सदस्य समिती नेमली होती. महामंडळाने या संदर्भात २००८मध्ये चार शहरांमध्ये चर्चासत्रे घेतली व त्यातून ही सात सदस्यीय समिती नेमण्यात आली. विविध सूचना या समितीने आपल्या अहवालातून केल्या. या समितीने यावर्षी मार्च महिन्यात साहित्य महामंडळाकडे अहवाल सुपूर्द केला. मात्र, त्याचवेळी महामंडळाच्या पुण्यातील कार्यालयाची मुदत संपत असल्याने त्यावर फार काम होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)