शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शहरातील अघोषित पाणी कपात अखेर रद्द होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 2:03 PM

शहरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर गुरुवारी सुरु असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुक्ता टिळक : शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद ठेऊन उपयोग नाही

पुणे : शहरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर गुरुवारी सुरु असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी बचतीसाठी ही कापत करण्यात येत असली तरी प्रत्यक्ष अपेक्षित पाणी बचत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या उलट दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्यामुळे प्रचंड उन्हामुळे पाणी उडून जाते. यामुळे पाईपलाईनमध्ये गॅस निर्माण होऊन नंतर दोन-तीन दिवस पाणी पुरवठ्यामध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे यापुढे दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद न ठेवता अन्य काही पर्याय आहेत का याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.महापालिकेच्या सोमवार (दि.२०) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधकांनी महापालिकेकडून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊन अघोषित पाणी कपात सुरु केली असल्याचा आरोप केला आहे. या एक दिवसांच्या क्लोजरच्या नावाखाली शहराच्या अनेक भागात तीन-चार दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केला.याबाबत मंगळवारी (दि.२१) रोजी महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने आयुक्त सौरभ राव यांच्यासह संबंधित सर्व अधिका-यांची बैठक घेतली. यामध्ये सध्या दररोज शहरासाठी किती पाणी उचले जाते, १३५० एमएलडी पाणी उचले तर किती दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. गुरुवारी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला तरी नंतरचे दोन-तीन दिवस नागरिकांना अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत. यामुळे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेऊन अपेक्षित कपात होत नसल्याने यापुढे गुरुवारची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत अन्य पर्यायावर चर्चा सुरु असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकSaurabh Raoसौरभ राव