बारामती शहरातील अनधिकृत कत्तलखाने 'सील' ; नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 19:09 IST2020-05-13T19:08:37+5:302020-05-13T19:09:11+5:30
कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.

बारामती शहरातील अनधिकृत कत्तलखाने 'सील' ; नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
बारामती : बारामती शहरात पत्र्याच्या शेडमध्ये चालविले जाणारे अनधिकृत कत्तलखाने प्रशासनाने सील केले आहेत.नगरपरीषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करीत बुधवारी(दि १३) दुपारी येथील शेड सील केले.कोरोनासंसर्गाच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आलीआहे.त्याची १७ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती नगरपरिषदहद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात क-हा नदी स्मशानभूमी रिंगरोड पुलापासून ते देवळे इस्टेट कुरेशीवस्ती गावडे हॉस्पिटल पर्यंत कासन हसन कुरेशी(रा.खाटीकगल्ली), मानुद्दीन मुबारक कुरेशी (रा.देवळे इस्टेट, बारामती ,
सलाम इसाक कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी , बारामती),समदहाजी बकस कुरेशी (रा. म्हाडा कॉलनी,बारामती), आसिफ मुस्तफा कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी बारामती) (जावेद हारून कुरेशी रा.म्हाडा कॉलनी बारामती) यांनी अनधिकृत पत्राशेडटाकलेली आहेत.या अनधिकृत पत्राशेड च्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालू आहेत. त्यामुळे परिसरात अत्यंतदुर्गंधी पसरत आहे. आरोग्य घातकपरिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे अनधिकृत पत्राशेड सिल करण्याचे आदेश मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी दिले.त्यानुसार बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,सुभाष नारखेडे,अजय लालबिगे,सहायक पोलीसनिरीक्षक पद्मराज गंपले,जागाभाडे विभाग प्रमुख सुनील धुमाळ, अतिक्रमणविभाग प्रमुख संतोष तोडकर,योगेश लालबिगे,बळवंत झुंज यांच्यासह अतिक्रमणविभागाच्या पथकाने हि कारवाई केली.