अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी
By Admin | Updated: July 2, 2014 01:37 IST2014-07-02T01:36:55+5:302014-07-02T01:37:28+5:30
शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.

अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी
पुणे : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणे महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे.
शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)