शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

समाविष्ट गावांमध्ये बेकायदा बांधकामे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:15 AM

पुणे : समाविष्ट गावांमध्ये बेकायदा बांधकामांचे पेवच फुटले असून, महापालिका प्रशासन; तसेच पूर्वीची नियंत्रक संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पीएमपीआरडी यांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : समाविष्ट गावांमध्ये बेकायदा बांधकामांचे पेवच फुटले असून, महापालिका प्रशासन; तसेच पूर्वीची नियंत्रक संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पीएमपीआरडी यांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेची परवानगी नसते अशा पद्धतीने बांधकामे केली जात असून, ती महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीची असल्याचे दाखवले जात आहे.राज्य सरकारने काहीही सूचना न देता धायरी, शिवणे, उत्तमनगर, उंड्री, देवाची उरुळी, फुरसुंगी, लोहगाव, केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, साडेसतरानळी या ११ गावांचा समावेश महापालिकेत केला. त्यामुळे या गावांच्या प्रशासनाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा समावेश करताना राज्य सरकारने महापालिकेला विकासकामांसाठी म्हणून काहीही निधी दिलेला नाही. या भागात निवासी सोसायट्या, तसेच व्यावसायिक बांधकामे झालेली असली, तरीही रस्ते, पाणी, वीज अशा नागरी सुविधांची वाणवाच आहे. त्या देण्यासाठी निधी आणायचा कुठून, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.सरकारचे काही मार्गदर्शनच नसल्यामुळे या गावांमध्ये महापालिकेच्या अन्य क्षेत्राप्रमाणे व्यवस्था लावणे महापालिकेसाठी अडचणीचे झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या ११ गावांमध्ये मिळून साधारण ५०० एकर जमिनीवर बांधकामांच्या परवानग्या दिल्या गेल्या आहेत. पूर्वी जिल्हा परिषद व नंतर काही वर्षे पीएमपीआरडी यांच्याकडून या परवानग्या दिल्या गेल्या. यातील अनेक बांधकामे नियमबाह्य म्हणजे मंजूर नकाशानुसार झालेली नाहीत. अजूनही अनेक बांधकामे तशीच होत आहेत. उलट आता महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे व महापालिकेची तपासणीसाठी कसलीच यंत्रणाच कार्यान्वित नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे.निवासी बांधकामाविषयीचे महापालिकेचे नियम, अटी कडक आहेत. निवासी क्षेत्र असेल तर त्याकडे येणारे रस्ते, ड्रेनेज लाइन अशा सर्व गोष्टी बघितल्या जातात. विकासनिधी शुल्कही बरेच आहे. त्यामुळे जुनी परवानगी आहे असे दाखवत त्यावर सध्या सर्व बांधकामे केली जात आहे. ज्यांच्याकडे परवानगी नाही, तेही बांधकाम करून घेत आहेत. उलट महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित होण्याआधी बांधकाम पूर्ण करून घेण्याकडेच त्यांचा कल आहे. गावे महापालिकेत गेली म्हणून जिल्हा परिषद, पीएमआरडीए लक्ष देत नाही व महापालिकेची यंत्रणा अजून सुरूच झालेली नाही याचा गैरफायदा सर्व गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून घेतला जात आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागाने अद्याप या गावांमध्ये काहीही काम सुरू केलेले नाही. नव्या बांधकामांच्या परवानग्या कोणी द्यायच्या, त्यासाठी अर्ज वगैरे कुठे करायचे याबद्धल अनभिज्ञताच आहे. जुन्या बांधकामांच्या नोंदी करण्याचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. असेच होत राहिले तर गावांमध्ये काही नियोजनच राहणार नाही, यापूर्वी महापालिकेत आलेल्या गावांकडे महापालिकेच्या तत्कालीन प्रशासनाने असेच दुर्लक्ष केले, त्यामुळे त्या गावांमध्ये बकालपणा निर्माण झाला, नियम नसलेली बांधकामे उभी राहिल्यामुळे आपत्तीकाळात त्यांना मदत देणे अवघड झाले. तसेच, या गावांचेही होईल. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे व सर्व विभागांकडील यंत्रणा या गावांमध्ये कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी समावेशासाठी प्रयत्न करणाºया हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी केली आहे.गावांमधील मालमत्ताधारकांकडूनच महापालिकेला घरपट्टी वसूल करायची आहे. त्यामुळे मिळकत कर विभागाने या गावांमधील बांधकामांच्या नोंदी करणे गरजेचे आहे.याही कामांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. अशा नोंदी वगैरे करण्यात अद्याप सुरुवात झालेली नाही.

टॅग्स :Puneपुणे