शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मारुंजीत पीएमआरडीएकडून चारमजली अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:33 IST

३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती.

ठळक मुद्देनोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु अनधिकृत बांधकामाचा निवासी व व्यावसायिक जागेसाठी वापर

पुणे : मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कारवाई केली. या कारवाईमध्ये चारमजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मारुंजी येथील सर्व्हे नंबर ४५ मधील गंगाराम विश्नोई व जितेंद्र रजपूत यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (1) अन्वये त्यांना नोटीसा पीएमआरडीएच्या वतीने देण्यात आल्या होत्या. मात्र, नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. या बांधकामाचे क्षेत्रफळ हे एकूण ९२०.१६ चौरस मीटर आरसीसी स्वरुपात चारमजली होते. या अनधिकृत बांधकामाचा निवासी व व्यावसायिक जागेसाठी वापर केला जात होता. ३ व ४ एप्रिल २०१८ रोजी सलग दोन दिवस अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक दोन मार्फत सुरु होती. धोकादायक पद्धतीने या अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, अनधिकृत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तथा प्रभारी उपअभियंता श्रीधर फणसे, साहायक अभियंता एम. आय. शेख तसेच हिंजवडी पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलीस बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. 

.................पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक ठिकाणी खासगी विकसकाकडून नागरिकांना वेगवेगळी आमिष दाखवून व्यवहारासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या सदनिका खरेदी करताना पूर्ण माहिती घेऊन खरेदी करावीत. अनधिकृत सदनिका या स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात, याकरिता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. या सदनिकांची शहानिशा करूनच मगर व्यवहार करावे.  किरण गित्ते, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएBuilding Collapseइमारत दुर्घटनाKiran Gitteकिरण गित्ते