umesh vasve is second khali OF Pune city | पुण्यातील उमेश वसवे म्हणजे मराठी मुलुखातील '' दुसरा खली ''
पुण्यातील उमेश वसवे म्हणजे मराठी मुलुखातील '' दुसरा खली ''

ठळक मुद्देपुण्यातील असणाऱ्या उमेश वसवेचा महाराष्ट्रात बोलबाला 

- कल्याणराव आवताडे-  
पुणे : उंची सात फूट, वजन १४५ किलो, बुटाचा साईज १७ नंबर, वय ३७ वर्षे आणि एकावेळी १ किलो मटण फस्त करणारा असा आगळावेगळा माणूस ' महाराष्ट्राचा खली ' म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा हा कलाकार राजकीय व सिनेक्षेत्रात आकर्षणाचा विषय होत आहे.  
पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील असणारा उमेश रमेश वसवे यांनी शाळेत असतानाच तलवारबाजी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, व राष्ट्रीय पातळीवर तलवारबाजीत विशेष प्राविण्य मिळवत राज्यस्तरावर ३० तर राष्ट्रीय स्तरावर ९ पदके मिळविली. महाराष्ट्राचा खली, महाराष्ट्राचा हिमालय, प्राईड ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कारही देऊन अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. 


वडील रमेश वसवे हे रिक्षाचालक असल्याने घरची परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे उमेश यांनी काही काळ हमालचेही काम केले. मात्र आयुष्यात काहीतरी चांगले काम करून नाव कमावण्याचे ठरवल्याने उमेशने आपल्या उंचीचा फायदा करिअरसाठी करून घेत राजकीय नेते, सेलेब्रिटी, तसेच पबमधे बाउन्सर पुरविण्याचे काम सुरु केले. त्यातून चांगली कमाई होत असल्याने हॉटेल व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. त्याचबरोबर छोट्यामोठ्या कार्यक्रमात उमेश यांनाच सेलेब्रिटी म्हणून बोलावत आहेत. त्यांचे लग्न झाले असून त्यांना आठ वषार्ची वैष्णवी नावाची मुलगीही आहे. स्पोर्टमन असूनही अभिनयाची आवड असलेल्या उमेश यांनी छोट्या -मोठ्या भूमिका करून नावही कमाविले. सोनू तुला माज्यावर भरोसा न्हाय का ह्या गाण्यात, तसेच रोडीज भाग ८, मराठा बटालियन, दाल मे कुछ काला है, थोडी लाईफ थोडी मॅजिक आदी चित्रपटांत छोट्या भूमिकाही केल्या आहेत. उंच लोकांसाठी सरकारने एखादी संस्था स्थापन करावी, अशी इच्छा असली तरी याबाबत सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्याची खंत उमेश वसवे यांनी लोकमतशी प्रतिनिधींशी बोलताना केली. खलीने डब्लू डब्लू एस मध्ये नाव कमविले असले तरी खलीप्रमाणेच आगळावेगळा दिसणारा उमेशही कला क्षेत्रात नाव कमावू शकतो, ह्यात शंका नाही.  

 अमेरिकेमधून मागवावे लागतात बूट .. 
लहानपणापासून उमेश यांना खेळाची आवड होती, त्यांना लागणाºया सतरा नंबरचा बूट व चपला भारतात उपलब्ध होत नसल्याने त्या अमेरिकेतून मागवाव्या लागतात. वापरासाठी लागणारे कपडेही शिवूनच घयावे लागतात, सर्वसामान्य माणसाला लागणाºया कापडापेक्षा त्यांना दुप्पट कापड लागते. तसेच त्यांच्या डोक्याच्या मापाचे हेल्मेटही बाजारात मिळत नाहीत. 

खºया खलीनेही केले महाराष्ट्राच्या खलीचे कौतुक 
कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा कार्यक्रमात उमेश वसवे यांनी खºया खलीला भेटायची इच्छा व्यक्त केल्यांनतर खलीने त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांचा 'महाराष्ट्राचा खली' म्हणून कौतुकसुद्धा केले. काही काळ सेलेब्रिटींसाठी बाउन्सर म्हणून काम करताना काही सेलेब्रिटींनीच महाराष्ट्राच्या या खलीसोबत सेल्फी काढले आहेत. 

१. खºया खलीसोबत उमेश वसवे 
२. कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा या कार्यक्रमातही सहभागी
 


Web Title: umesh vasve is second khali OF Pune city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.