शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उद्या सकाळी ९ पर्यंतचा प्रशासनाला 'अल्टिमेटम'; नाहीतर ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 17:14 IST

प्रशासनाचा ससूनमधील बेड्स वाढविण्याचा निर्णय फक्त जनतेला दाखविण्यासाठी.....

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन यंत्रणा ससून रुग्णालयातील बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्यासोबत मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन,वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार करत उद्या सकाळी ९ पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड' ने दिला आहे. 

पुण्यात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णलयातील बेड्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर ससूनमधील बेड्स वाढवण्याचा निर्णय प्रशासनानेे घेतला आहे. मात्र त्याला आता 'मार्ड'तर्फे विरोध करण्यात येत आहे.मात्र, काम बंदचा इशारा देतानाच कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.  

मार्डचे काही निवासी व प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणाले, कोरोनाची शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेड्स उपलब्ध करून देणे गरजेचे देखील आहे. ही परिस्थिती आम्हाला समजत आहे. मात्र, प्रशासनाने बेड्स वाढविण्यासोबतच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सह इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा आधी करावा. त्यानंतर बेड्सची संख्या वाढवावी. प्रशासन या संबंधी गंभीर नसून फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे . 

मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही रुग्णसेवेचे काम करीत आहोत. सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र, निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढविले तर किमान १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. तरच रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांच्यापुढेही आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. आमची मनुष्यबळ वाढविण्याची मागणी आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर शनिवार (दि.१७) पासून तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. कोरोना वॉॅर्ड, कॅॅज्युलिटी, आयसीयू, लेबर रूम, सर्व प्रकारच्या तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता इतर सेवा देणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

दुसऱ्या लाटेची कल्पना जर डिसेंबर 2020 लाच आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी म्हणाले, मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे पेशंटची उपचार व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाईल. तसेच बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ,साधनसामुग्री प्रशासनाकडे आहेत का? कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्ससाठी क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा नाही, त्यामुळे एका महिन्यात आमचे ८० निवासी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले. आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करत असून त्यावर पावले आतापर्यंत प्रशासनाकडून उचलली गेलेली नाही.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या