Ujani Dam| उजनी धरणातून ८० हजार क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 02:08 PM2022-09-16T14:08:53+5:302022-09-16T14:09:05+5:30

पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला....

Ujani Dam 80,000 cusecs released from Ujani dam, alert warning to riverside residents | Ujani Dam| उजनी धरणातून ८० हजार क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ujani Dam| उजनी धरणातून ८० हजार क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next

कळस (पुणे) : उजनी धरणात सध्या १२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दौंडवरुन धरणात ३६ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने असून भीमा नदीत ८० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे 

उजनी धरण ऑगस्टमध्येच पूर्ण भरले असून सध्या धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत आहे.

तसेच दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. उजनी जलाशयावरील खडकवासलासह १९ धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा होत आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. गेली दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार (दि. १६) उजनी धरणातून ८० हजार क्युसेक इतके पाणी सोडले जात आहे. तसेच उर्जा निर्मितीसाठी १६०० क्युसेक, पाणी सोडले जात आहे.

Web Title: Ujani Dam 80,000 cusecs released from Ujani dam, alert warning to riverside residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.