शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१३५ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासाला वर्धापनदिनी पुण्यात मिळणार उजाळा; कार्यक्रमांचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 13:20 IST

देशाच्या जडणघडणीतही महत्वाचे योगदान असणाऱ्या काँग्रेसला २८ डिसेंबरला १३५ वर्षे पूर्ण होत आहेत

ठळक मुद्देशहर काँग्रेसचा उपक्रम: केंद्र व राज्य शाखेत फक्त ध्वजवंदन

पुणे: पक्षाच्या २८ डिसेंबरला येणाऱ्या १३५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर शाखेच्या वतीने काँग्रेसच्या १३५ वर्षांच्या इतिहासाला एका खास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देण्यात येत आहे. त्याशिवाय पक्षाच्या विविध ऐतिहासिक घडोमोडींच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या तुलनेत पक्षाच्या राज्य व त्यानंतर केंद्रीय शाखेने फक्त ध्वजवंदनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीतही महत्वाचे योगदान असणाऱ्या काँग्रेसला २८ डिसेंबरला १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. शहर काँग्रेसच्या वतीने दरवर्षी हा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येत असतो.

काँग्रेसच्या अन्य कोणत्याही शाखेकडून या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम वगैरे आयोजित केले जात नाहीत. फारपूर्वी त्यावेळच्या प्रथेप्रमाणे काँग्रेसभवनमध्ये पानसुपारीचा कार्यक्रम होत असतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिकही याला हजेरी लावत असत. यावर्षी शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या प्रयत्नातून विशेष कार्यक्रम होत आहे. पक्षाच्या इतक्या वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणारी एक ध्वनीचित्रफित पक्षाला मिळाली आहे. 

शहर सरचिटणीस रमेश अय्यर व नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितले की, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एका मोटारीत एलईडी बसवून या ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पंडित नेहरूंपासून ते सोनिया गांधी यांच्यापर्यंतच्या पक्षाध्यक्षांच्या कारकिर्दीतील विशेष घडामोडींची माहिती आहे. याशिवाय पक्षाच्या वाटचालीची छायाचित्रांमधून माहिती देणारे एक प्रदर्शन छाजेड यांच्या संग्रही आहे. त्याचे २६ डिसेंबरपासून काँग्रेसभवमध्ये आयोजन करण्यात आले आहे. अनेकविध दुर्मिळ छायाचित्रांचा यात समावेश आहे. पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्याच्या उपस्थितीत वर्धापनदिन व्हावा असा प्रयत्न आहे, मात्र अद्याप कोण येईल ते नक्की झालेले नाही असे अय्यर यांनी सांगितले. पक्षाच्या शहरातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून ध्वनीचित्रफित संपुर्ण शहरात पाहिली जावी यासाठी तसे नियोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ......... राज्य स्तरावर नागपूर येथे एका भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा विचार प्रदेश कार्यकारिणीत होता. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे त्याला काही सदस्यांनी हरकत घेतली. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला, मात्र पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दरवर्षीप्रमाणे ध्वजवंदन व कोरोना योद्धांचा सत्कार असा कार्यक्रम होईल. मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस