Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 22:55 IST2022-07-24T22:54:40+5:302022-07-24T22:55:28+5:30
ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.

Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!
पुणे-
ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. तसंच रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला.
"उद्धव ठाकरे आता उभारी घेतील असं वाटत नाही. मोदींसोबत शिंदे असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात संख्या आणखी वाढेल. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत. म्हणजे खरी शिवसेनासोबत आहे. शिंदेंच्याच जास्तीत जास्त जागा येतील आणि उद्धव ठाकरे क्षीण क्षीण होत जातील", असा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त सांगितला
रामदास आठवले यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीही माहिती दिली. राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. तसंच हे सरकार पडणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.