शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला

By प्रमोद सरवळे | Updated: September 29, 2022 15:19 IST

आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला...

पुणे : शिरूरमधली काही माणसं ढळली, जे अढळ आहेत तेच माझ्यासोबत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटलांना लगावला. आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मुंबईत मातोश्रीवर संवाद साधला. सध्या हिंदुत्वाची तोतयागिरी करणाऱ्यांनी कळस गाठलाय. इतिहासात शिंदे गटाचे बंड तोतयांचे बंड म्हणून असं ओळखलं जाईल, असा घणाघातही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्या आढळराव पाटलांवर निशाणा साधला आहे. यावळी ते म्हणाले, ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे, तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोकं आढळली नाही पाहिजेत. येत्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. 

पुणे जिल्ह्यात 'इनकमिंग'-

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेत इनकमिंग झाली आहे. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिरूर मतदारसंघात शिवसेना ताकद कमी झाल्याचे बोलले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात शिवसेनेतील वाढती इनकमिंग पाहता जिल्ह्यात पुऩ्हा शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) जोर लावल्याचे दिसत आहे.

'आपल्याला सर्व लढाया जिंकायच्या आहेत'-

दसऱ्याला आता काहीच दिवस राहिलेले आहेत. शिवतीर्थावर आपण भेटणारच आहोत. वाजत-गाजत, गुलाल उधळत सर्व कार्यकर्ते तिथे येणारच आहेत. आपण सर्वांनी शिस्त पाळा. कोर्टातील लढाई असो किंवा निवडणुकीतील आपल्याला सर्व लढाया जिंकायच्या आहेत, अशा भावना उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडल्या.

'गद्दारांना लोळवणार'-नवीन लोकांचे शिवसेनेत स्वागत आहे. पुणे जिल्ह्यात आम्ही जोमाने शिवसेना वाढवू. गद्दारांना लोळवल्याशिवाय सोडणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनाचा बालेकिल्ला होता आणि असेल. येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भगवा फडकणारच. आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी पंचायत समिती सदस्य, अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि लोकप्रतिनीधींनी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केल्याची माहिती शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे