शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:10 IST

पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता. मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.

पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी  देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वशंज असल्याचीही टीका उद्धव ठाकरेंनी केली. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांव निशाणा साधला.

"मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस," अशी टीका शिवसेना  उद्धव ठाकरे यांनी केली.

"मुनगंटीवारांनी वाघनखं आणली. अहो मुनगंटीवार नखाच्या मागे वाघ असतो तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या नखांच्या मागे मुनगंटीवार असतील तर ते कुठेतरी जुळत आहे का? महाराष्ट्रातील वाघनखे ही महाराष्ट्राची जनता आहे," असाही खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

अमित शाहांचा अब्दालीचे राजकीय वशंज म्हणून उल्लेख

"काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते. पण ते परत का आले?  महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहBJPभाजपा