शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुन्हा घडला कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार; आता सर्वजण गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST

पुणे : टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाइन चर्चा पर्यायाने ...

पुणे : टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाइन चर्चा पर्यायाने त्यांचे निमंत्रणच रद्द करण्यात आले तरी सर्वजण गप्प का? असा संतप्त सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराची साधी चर्चादेखील झाली नाही. मात्र, यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या वेळेस निरुपद्रवी मंडळी साहित्य महामंडळावर तुटून पडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये टाटा लिट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. चोम्स्की यांच्या ‘इंटरनॅशनलिझम और एक्सटिंगशन’ या नव्या पुस्तकावर चर्चा होणार होती. मात्र, त्यांना व प्रसाद यांना दुपारी मेल करून ही चर्चा रद्द केल्याचे कळविण्यात आले. या पुस्तकात काही मुद्दे वादग्रस्त असल्याने दोघांचे निमंत्रण रद्द झाल्याचे समजते. असाच काहीसा प्रकार यवतमाळ साहित्य संमेलनामध्येसुद्धा घडला होता. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनादेखील पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, आयोजकांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. संमेलन काळात सर्व वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, याची पुनरावृत्ती होऊनही माध्यमांनी साधी दखलही घेतली नसल्याची खंत ठाले- पाटील यांनी व्यक्त केली.

------

कोट

टाटांच्या आजपर्यंतच्या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत असा हा निर्णय आहे. टाटांची प्रतिमा अशी कचखाऊ कधीच नव्हती. टाटा लिटरेचर फेस्टिव्हलचे डायरेक्टर अनिल धारकरच्या माध्यमातून कोणाला घाबरत आहेत? लोकांसमोर असलेला एक आदर्श या निर्णयामुळे ढासळत आहे. यापेक्षा संपूर्ण फेस्टिव्हलच रद्द केले असते तर ही नामुष्की तरी टळली असती.

- कौतिकराव ठाले-पाटील

अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ