शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

थेऊरला नदीत बुडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू : नेपाळवरुन आलेल्या कुटुंबावर काळाचा आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 19:00 IST

मुलीचा मृतदेह शोधण्यात यंत्रणांना यश आले असून दोन महिलांचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता.

थेऊर : येथील मुळामुठा नदीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह ४ वर्षे वयाची १ लहान मुलगी बुडून मृत्युमुखी पडल्याची दुदैर्वी घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास थेऊर (हवेली) येथील स्मशानभूमीजवळ नदीपात्रात घडली. यातील मुलीचा मृतदेह शोधण्यात यंत्रणांना यश आले असून दोन महिलांचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता.

           भजन भगतसिंग भूल (वय १९), चंद्रकला एकराज उर्फ राजू भूल (वय २३) व सोनिया एकराज उर्फ राजू भूल (वय ४) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगतसिंग वीरबहादूर भूल (वय ६०, रा. कुंजीर कॉम्प्लेक्स, थेऊर, ता. हवेली) हे मुळचे नेपाळचे आहेत. मागील पंधरा वर्षापासून ते येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी भजन सुन चंद्रकला नात सोनिया व अनिषा (वय ११) नातू अभिषेक (वय ८) हे पाचजण कपडे धुण्यासाठी मुळामुठा नदीतीरावर स्मशानभूमीनजीक गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार कपडे धूत असताना सोनिया ही अंघोळ करत होती. परंतू, पाय घसरल्याने ती पाण्यात बुडू लागली. ती बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी भजन व चंद्रकला यांनी नदीत उडी टाकली. परंतू, तिघींनाही पोहता येत नसल्याने व त्या ठिकाणी नदीची खोली जास्त असल्याने त्या बुडाल्या. त्यांच्या समवेत नदीतीरावर असलेले अभिषेक व अनिषा हे दोघे रडत घरी आले.

           त्यांनी आजोबा भगतसिंग यांना सदर प्रकार सांगितला. घडलेला प्रसंग समजताच सर्वजण पळतच नदीतीरावर आले. त्यावेळी तेथे स्थानिक ग्रामस्थांशी गर्दी झालेली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सोनिया हिचा मृतदेह हाती लागला. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, त्यापूर्वीच ती मयत झाली होती.घटनेची माहिती मिळताच हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी  एनडीआरएफच्या पथकाला व अग्निशमन दलास कळविले.सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोणतेच आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहचलेले नव्हते. या तिघी नेमक्या कशा वाहून गेल्या याबाबत कोणास काहीच माहीत नाही. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. या घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूLoni Kandलोणी कंद