शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

रास्त धान्य घेतल्यास मिळणार दुचाकी :  एफडीओची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 7:57 PM

येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ई पॉस यंत्राद्वारे धान्य खरेदी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळण्याची संधी आहे.

ठळक मुद्देई पॉस मशिनद्वारे धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना करणार प्रोत्साहन काळाबाजाराला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण धान्य वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण

पुणे : ई पॉस यंत्राद्वारे शंभर टक्के धान्य वितरण व्हावे, नागरिकांना त्याची पावती मिळावी या साठी अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या (एफडीओ) वतीने भाग्यशाली सोडत काढण्यात येणार आहे. त्या अंतर्गत येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत ई पॉस यंत्राद्वारे धान्य खरेदी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळण्याची संधी आहे.  सार्वजनिक वितरण बळकट करण्यासाठी, काळाबाजाराला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण धान्य वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१५ पासून हाती घेतला आहे. त्या अंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये पुणे शहरामध्ये ८४० रास्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस यंत्र बसविण्यात आले. जुलै २०१७ पासून या यंत्राच्या माध्यमातूनच धान्य वितरण करण्यात येत आहे. मार्च २०१८मध्ये ई-पॉस यंत्राद्वारे ४७ टक्के धान्य वाटप होत होते. जानेवारी २०१९ अखेरीस ९१ टक्के धान्य या यंत्राच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहे. राज्यात दर महिन्याच्या ७ ते १५ तारखेदरम्यान अन्न सप्ताह राबविण्याचा निर्णय २०१२ साली घेण्यात आला. मात्र, अन्न सप्ताहात धान्य घेऊन जाण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखे पर्यंत धान्य वाटप पूर्ण करणे शक्य होत नव्हते. या शिवाय ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरण करताना रास्तभाव दुकानदार ग्राहकांना पावती देत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या त्रुटी देखील दूर व्हाव्यात या उद्देशाने येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत  शिधापत्रिकाधारकांसाठी भाग्याशाली योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत १५ फेब्रुवारी पर्यंत धान्याची उचल केलेल्या ग्राहकांना दुचाकी आणि प्रेशर कुकर मिळविण्याची संधी असेल. प्रत्येक परिमंडळ निहाय एका ग्राहकाला दुचाकी आणि प्रत्येक रास्त धान्य दुकानामागे एका व्यक्तीस प्रेशर कुकर दिला जाईल. ही सोडत ई पॉस यंत्रातील पावती क्रमांकावरुन काढली जाणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारtwo wheelerटू व्हीलर