ओतूर परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:59+5:302021-01-13T04:26:59+5:30
ओतूर गावठाण हद्दीत नागरिकांनी रात्रीच्या सुमारास आपल्याच घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी चोरीस जात ...

ओतूर परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
ओतूर गावठाण हद्दीत नागरिकांनी रात्रीच्या सुमारास आपल्याच घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी चोरीस जात असल्याने या सोकावलेल्या दुचाकी चोरांचा त्वरेने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
मंगळवार दि ५ रोजी रात्रीच्या सुमारास अनिल लक्ष्मण महाकाळ यांची होंडा कंपनीची लाल रंगांचीदुचाकी मोरे चौकाजवळील भरवस्तीतील भाग्य लक्ष्मी बिल्डिंग च्या समोरील जागेतुन अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरून नेली आहे.महाकाळ यांना ६ तारखेला सकाळी आपली दुचाकी चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी ओतूर पोलीस स्टेशनला जाऊन गाडी चोरी गेल्याची रीतसर फिर्याद दाखल केली आहे. दुचाकी चोर दिवसा पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास दुचाकीची चोरी करीत असावेत असा अंदाज ओतूर परिसरातील नागरिकातून व्यक्त केला जात आहे. जुन्नर तालुक्याच्या शेजारील नगर जिल्ह्यातील अकोले तालुका तसेच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याची हद्द आहे,मागील काळात चोरीस गेलेल्या असंख्य दुचाकी गाड्यांचा तपास त्या भागात लागला असल्याने हे चोर सराईत गुन्हेगार व दुचाकी चोर असावेत अशी चर्चा व्यक्त होत आहे. तसेच वाहन चोरी केल्यावर लवकरात लवकर हद्द बदलून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत असल्यामुळे चोरट्यांना या विभागातून वाहन चोरी करून फरार होण्यास सोईस्कर व सोपे झाले आहे.
ओतूर परिसरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकातुन होऊ लागली आहे