दुचाकी वाहनांच्या चोरीचे गुन्हे सर्वाधिक प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:00+5:302020-12-04T04:30:00+5:30

पुणे : शहरात दररोज पाच ते सहा वाहन चोरीचे गुन्हे दाखल होत असले तरी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे ...

Two-wheeler theft cases most pending | दुचाकी वाहनांच्या चोरीचे गुन्हे सर्वाधिक प्रलंबित

दुचाकी वाहनांच्या चोरीचे गुन्हे सर्वाधिक प्रलंबित

पुणे : शहरात दररोज पाच ते सहा वाहन चोरीचे गुन्हे दाखल होत असले तरी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. शहरातील या वर्षी आतापर्यंत तब्बल ७४१ दुचाकी वाहने चोरीच गेली असून त्यापैकी २२५ वाहनांचा शोध घेण्यात व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण केवळ ३० टक्के इतकेच आहे. अन्य गुन्ह्यांच्या तपासामध्ये सर्वात कमी गुन्हे दुचाकी वाहनांच्या चोरीचे उघडकीस आले आहेत. गेल्या वर्षी १३८१ दुचाकी वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी ५२९ वाहनांचा शोध लावण्यात आला असून त्याचे प्रमाण ३८ टक्के इतके होते.

दुचाकी वाहनांबरोबरच चार चाकी वाहनाच्या तपासाचे प्रमाण कमी आहे. यंदा २७ नोव्हेंबर अखेरपर्यंत ६१ चारचाकी वाहने चोरीला गेली असून त्यापैकी २२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आहे. ६४ टक्के गुन्हे प्रलंबित आहेत.

या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प् असल्याने गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली असली तरी त्याचवेळी पोलीस बंदोबस्तात अडकून पडले होते. कोरोना संसर्गामुळे तपासासाठी पोलिसांना तपासासाठी बाहेरगावी जाण्यात अडचणी होत्या. त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण काही प्रकरणात कमी आहे. एकूण मालमत्तेच्या गुन्ह्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाण ४४ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते.

वाहनचोरीच्या गुन्ह्यांपाठोपाठ इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे ४७ टक्के इतके आहे. दिवसा घरफोडीच्या गुन्हे ४९ टक्के उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

...........

प्रलंबित गुन्हे

गुन्हे दाखल उघड टक्केवारी प्रलंबित

दुचाकी वाहने ७४१ २२५ ३० ५१६

इतर चोरी ४७८ २२६ ४७ २५२

चारचाकी वाहने ६१ २२ ३६ ३९

दिवसा घरफोडी ४९ २४ ४९ २५

रात्री घरफोडी २५४ १३५ ५३ ११९

गुन्हे घडल्यानंतर त्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेतला जातो. तपासासाठी मार्गदर्शन केले जाते. गुन्हे शाखेकडून महत्वाच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात येतो. त्यामुळे शरीराविरुद्धचे गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी असते. वाहनचोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एकाच गुन्हेगाराकडून अनेक गुन्हे उघडकीस येत असतात. त्यामुळे आता जरी असे गुन्हे प्रलंबित असलेले दिसत असले तरी काही काळानंतर त्यांचा तपास लागू शकतो.

- सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Two-wheeler theft cases most pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.