शेवाळवाडीत दोन दुचाकींचा अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST2021-01-16T04:13:59+5:302021-01-16T04:13:59+5:30

याबाबत तुषार दगडू सोमोशी याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २७ डिसेंबर दुपारी अडीचच्या ...

Two-wheeler accident at Shewalwadi; One killed | शेवाळवाडीत दोन दुचाकींचा अपघात; एक ठार

शेवाळवाडीत दोन दुचाकींचा अपघात; एक ठार

याबाबत तुषार दगडू सोमोशी याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २७ डिसेंबर दुपारी अडीचच्या सुमारास शेवाळवाडी (मंचर) गावच्या हद्दीत असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील डिंबे उजवा कालव्याजवळ दुचाकीवरून विजय किसन बांगर (वय ५२) तसेच मागे बसलेले दगडू सखाराम सोमोशी (वय ७० दोघे रा.शिरोली खुर्द ता.जुन्नर) हे दोघे पुणे-नाशिक महामार्गावरून शेवाळवाडीला जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीने बांगर यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने बांगर यांच्या मोटर सायकलला धडक दिली. बांगर यांच्या खांद्यास दुखापत झाली असून दगडू सोमोशी यांच्या हातापायास तोंडास व डोक्यास गंभीर जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मंचर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two-wheeler accident at Shewalwadi; One killed