शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काळभोर टोळीतील गुंडाकडून दोन गावठी पिस्तुल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 15:23 IST

अजय काळभोर टोळीतील गुंडाकडून गुंडा स्कॉड उत्तर विभागाने २ गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केली आहे.

ठळक मुद्देओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमविण्यासाठी हत्यारे आणल्याचे तपासात निष्पन्न

पुणे : पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अजय काळभोर टोळीतील गुंडाकडून गुंडा स्कॉड उत्तर विभागाने २ गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केली आहे. दत्ता विठ्ठल आगलावे (वय २५, रा़ तुकारामनगर, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे़. काळभोर टोळीची पिंपरी, चिंचवड, चिखली या भागात प्रचंड दहशत आहे   आगलावे याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे खुन, कट रचणे, दरोड्याचा प्रयत्न तसेच गावठी कट्टे, पिस्तुल बाळगणे असे ४ गुन्हे दाखल आहेत़. लोणावळा ग्रामीणमध्ये २, तळेगाव दाभाडे, चिंचवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे़. चिंचवड पोलिसांनी आगलावे व अन्य दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३ पिस्तुल जप्त केली होती़. गुन्हे शाखेच्या उत्तर विभाग गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी यापूर्वी या टोळीचा म्होरक्या अजय काळभोर व तिरुपती ऊर्फ बाब्या जाधव यांना २७ मार्च रोजी अटक करुन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व ३ काडतुसे जप्त केली होती़. ही शस्त्रे आगलावे यानेच त्यांना दिली होती़. याची माहिती मिळाल्यावर नाईकवाडी यांनी न्यायालयामार्फत आगलावे याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली़. त्यात त्याने मध्यप्रदेशातील उमरठी येथून आणलेली आणखी दोन गावठी पिस्तुल व ४ काडतुसे काढून दिली़. ही हत्यारे पुण्यातील ओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमविण्यासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी राजू मोरे, भालचंद्र बोरकर आदींनी ही कामगिरी केली़.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस