शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 8:46 AM

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजचा गुरुवार हा जळीत वार ठरला आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजचा गुरुवार हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अमृतांजम पुलाजवळ किमी नं  45/600 जवळ घडली. याठिकाणी  ट्रक (नं एमएच-46- अेआर-5135) याचे इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आगीने पेट घेतल्याने ट्रकच्या आतील केबिन व बोनेट जळाले. लोणावळा शहर पोलीस व रस्ते विकास महामंडळाच्या पथकाने सदरची आग विझवत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.दुसरी दुर्घटना ही खोपोली हद्दीत ढेकू गावाजवळ घडली. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलावरून एक टँकर खाली पडल्याने त्याला आग लागली व त्याने पेट घेतला. ही आग ऐवढी भयंकर होती की सर्वत्र धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत होत्या. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती समजताच  देवदूत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम, हायवे पोलीस यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दोन्ही घटनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.