शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पुणेकरांना ‘कन्नड’ ची गोडी; दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी गिरवले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 17:15 IST

महाराष्ट्र-कर्नाटक मधून विस्तवही जात नसल्याची एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे मराठी-कन्नड भाषांचा अणुबंध पुणेकरांकडून विणला जात आहे.

ठळक मुद्देमराठी आणि कन्नड भाषेचा जवळपास ८०० वर्षांपासूनचा अनुबंध केंद्राकडून कन्नड भाषेची दरवर्षी लेखी आणि तोंडी अशी दोनशे मार्कांची परीक्षा अमराठी भाषिकांचा ‘मराठी’ वर्गाला प्रतिसाद नाही 

पुणे : कर्नाटक सीमा प्रश्नाचं घोंगडे शासनदरबारी अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. मात्र, या राजकीय वादात न पडता मराठी आणि कन्नड भाषिकांकडून भाषेच्या संवादाचा धागा विणला जात आहे. कन्नड भाषेबाबत मराठी भाषिकांमध्ये ’गोडी’ वाढत असून, मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांनी कन्नडचे धडे गिरविले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेविषयी प्रेम आणि अभिमान असतो. आपल्या मूळ गावापासून दूर गेलो तरी भाषेवरचे प्रेम कधीच कमी होत नाही. आज कर्नाटक राज्यातील कितीतरी कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाली आहेत. महाराष्ट्रातही अनेक कन्नड शाळा आहेत. जुन्या व्यक्तींचा आपल्या गावाशी संपर्क कायम असला, त्यांना मातृभाषा बोलता येत असली तरीही कुटुंबांतील पुढच्या पिढ्यांची आपल्या भाषेविषयीची नाळ जवळपास तुटली आहे. त्यामुळे आपल्याच कन्नड भाषिकांशी संवादाची दालनं बंद झाल्याची नव्या पिढीची अवस्था आहे. यातच इंग्रजी ही व्यावहारिक भाषा बनल्याने प्रादेशिक भाषांसमोर अस्तित्व टिकविण्याचे खूप मोठे आव्हान आहे. कित्येक वर्षांपासून राजकीय पटलावर कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र-कर्नाटक मधून विस्तवही जात नसल्याची एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे मराठी-कन्नड भाषांचा अणुबंध विणला जाणे, ही जमेची बाजू आहे. कृष्णा हेगडे हे स्नेहवर्धन केंद्राच्या माध्यमातून दोन भाषांमध्ये  सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मराठी आणि कन्नड भाषेचा अनुबंध जवळपास ८०० वर्षांपासूनचा आहे. मराठीमधील काही शब्दांची व्युत्पत्ती कन्नड भाषेमधून झाली आहे. उदा: मराठीमध्ये  ‘हुडकणे’ असे म्हणतात. मूळ क्रियापद  ‘हुडकू’ आहे जे कन्नडमधून आले आहे. तसेच ‘पाणी तुंबले’ हा मराठी शब्द. मूळ  ‘तुंबू’ हा कन्नड शब्द आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा मूळ कर्नाटकचा आहे जो इथे येऊन स्थायिक झाला आहे. कर्नाटकामधील अनेक कुटुंब देखील महाराष्ट्रात स्थायिक झाली आहेत. इथे येऊन ते मराठी शिकले, मात्र, त्यांच्या पिढ्यांचा कन्नड भाषेशी गंधच राहिलेला नाही. ते कन्नड शिकू शकले नाहीत. त्यामुळे पुणेकर झालेल्या मराठी भाषिकांचा कन्नड शिकण्याकडे ओढा वाढत आहे. यातच ब-याचशा आयटी कंपनी बेंगळूरमध्ये आहेत. स्थानिक भाषेतील लोकांशी संवाद साधण्यासाठी कन्नड भाषेचा आधार घेतला जात आहे. केंद्राकडून दरवर्षी लेखी आणि तोंडी अशी दोनशे मार्कांची परीक्षा घेतली जाते. आजपर्यंत दोन हजारांहून अधिक तरूण आणि ज्येष्ठ नागरिकांनी ही परीक्षा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------------------------------------------अमराठी भाषिकांचा ‘मराठी’ वर्गाला प्रतिसाद नाही अमराठी भाषिकांसाठी स्नेहवर्धन केंद्राकडून मराठी भाषेचा वर्गही घेतला जातो. मात्र अमराठींकडून ‘मराठी’ वर्गाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केली. -------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकmarathiमराठी