शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा दोन भामट्यांनी वृद्धाला लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:06 IST

मी पोलिस आहे. व त्यांचा कडील बनावट पोलिस आयकार्डदाखवून या रस्त्याला चोरटे आले आहे, असे सांगितले

ठळक मुद्देराजगुरुनगर येथील वाडा रोड येथील घटना

राजगुरुनगर :.पोलिस असल्याची बतावणी करुन दोन भामट्यांनी वृद्धाकडील सोन्याची साखळी , अंगठी असा ४४ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला. शुक्रवारी ( दि. २० ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाडारोड (ता. खेड ) संगम गार्डनसमोर प्रकार घडला. याबाबत काशिनाथ महाराज गोपाळे ( वय ५५ )रा. कोहिनुर सोसायटी वाडा रोड ,(ता खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ गोपाळे यांचे वाडारोड येथे किरणा मालाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी १० वाजता त्यांची नात जान्हवी हिला स्कुल बस मध्ये सोडण्यास गेले होते. परत माघारी येताना संगम गार्डन समोर वाडारोड रस्त्यावर एक अज्ञात इसम दुचाकी लावून उभा होता.गोपाळे हे येताच. त्या इसमाने सांगितले, मी पोलिस आहे. व त्यांचा कडील बनावट पोलिस आयकार्ड गोपाळे यांना दाखवून या रस्त्याला चोरटे आले आहे. तुमच्या हातातील अंगठया, व गळ्यातील चैन रुमालात बांधून ठेवा. दरम्यान, दुसरा चोराटा तिथे आला. त्यालाही खोटी खोटी दमदाटी करून तुला माहित आहे का मी, पोलिस आहे. तुझ्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट व हातातील अंगठ्या काढून रुमालात बांधून ने याठिकाणी चोरटे आले आहे. या इसमाने खिश्यातुन रुमाल काढून घाईघाईने हातातील ब्रेसलेट व अंगठया रुमालात बांधुन रुमाल खिश्यात घातला. गोपाळे यांचा विश्वास संपादन करून गोपाळे यांना या इसमाने सांगितले कि बाबा अंगावर सोने घालून फिरू नका, परिसरात लूटमार सुरू आहे. सोने काढून खिशात ठेवा,' असे सांगितले गोपाळे यांनी लूटमारीच्या भीतीपोटी रुमाल खिश्यातुन काढताच चोरट्यांनी त्यांच्या बोटातील १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी, अर्धा ग्राम सोन्याची अंगठी, व गळयातील १ तोळ्याची चैन, शर्टच्या वरच्चा खिश्यातील डायरी व रोख ५ हजार रुपये काढून रुमालात बांधुन देत असताना हातचलाखी करून फक्त डायरी व ५ हजार रुपये रुमालांत बांधून त्यांची गाठ मारून गोपाळे यांना खिस्यात घालण्यासाठी दिला. दोन्ही भामट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. गोपाळे हे १० मिनिटांनी ते किरणा दुकानात गेले. दरम्यान त्यांनी खिस्यातील रुमाल काढून गाठ सोडली असता फक्त डायरी व ५ हजार रुपये आढळून आले. सोन्याच्या अंगठया व गळयातील चैन गायब असल्याचे निर्दशनास येऊन या भामट्यांनी चोरी केली असल्याचे गोपाळे यांच्या लक्षात आले.पोलिस असल्याची बतावणी करून लूट करण्याचे प्रकार गेल्या वर्षाभरात थांबले होते, मात्र पुन्हा भरवस्तीत असा प्रकार घडल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर