शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

पीएमपीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 6:27 PM

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती.

ठळक मुद्देनिलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले असले तरी त्यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार

पुणे : कामातील अनियमिततेचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील दोन अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. मात्र, त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले असले तरी चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी व पास विभाग प्रमुख संतोष माने यांच्यावर कारवाई केली होती. दोघांनाही निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली गेली. या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याचे प्रशासनाला सांगितले होते. मुंढे पदावर असेपर्यंत दोघेही कामावर रुजू झाले नाही. मुंढे यांच्या बदलीनंतर गुंडे यांनी फेब्रुवारी महिन्यात पदभार स्वीकारला. त्यानंतर तीन महिन्यांतच गवळी व माने यांना पीएमपीमध्ये पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतचे कार्यालयीन परिपत्रकही काढण्यात आले आहे.गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मेपासून दोघांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. गवळी यांच्याकडे बीआरटी व आटीएमएस विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयाच्या समन्वयाचे काम माने यांच्याकडे देण्यात आले आहे. तेथील प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, गवळी व माने यांचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले असले तरी त्यांची चौकशी यापुढेही सुरुच राहणार आहे. निलंबनाच्या काळात त्यांना काही वेतन द्यावेच लागत होते. त्यामुळे सेवेत घेऊन चौकशी केली जाईल.-----------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेtukaram mundheतुकाराम मुंढे