वारूळवाडीतील दोन सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST2021-05-06T04:10:25+5:302021-05-06T04:10:25+5:30

सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळून आल्यास तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजवणी ...

Two societies in Warulwadi declared as restricted areas | वारूळवाडीतील दोन सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित

वारूळवाडीतील दोन सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र घोषित

सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळून आल्यास तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजवणी वारूळवाडी ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. शहरातील वॉर्ड क्र. ६ आणि वॉर्ड क्र. २ मधील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून प्रशासनाने जाहीर केला आहे, या भागांमध्ये ५ पेक्षा जास्त प्रमाणात कोविडचे रुग्ण आढळून आल्याने व मृत्यू संख्येमध्ये वाढ होत असल्याने गावाच्या हितासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाच्या आदेशानुसार तो भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करून त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र फ्लेक्स व प्रतिबंधात्मक क्षेत्र असल्याचे नोटीस लावण्यात आली.

या वेळी सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य जंगल कोल्हे, विनायक भुजबळ, सदस्या स्नेहल कांकरिया, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक वैभव सहाणे, पोलीस हवालदार एस. डी. सातपुते, गोकुळ कोळी, कोरोना कमिटी सदस्य उपस्थित होते.

०५ नारायणगाव

वारूळवाडी शहरातील सोसायटीमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करताना वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य, पोलीस प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी.

Web Title: Two societies in Warulwadi declared as restricted areas