शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा तुरुंगातील हायप्रोफाईल आरोपीला परस्पर घरी नेणारे दोन पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 20:44 IST

फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले.

पुणे : फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले. या दोघा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना एच. गोरे यांनी त्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश जारी केले आहेत.      पोलिस नाईक नामदेव दादाभाऊ डगळे आणि कमलेश बाळासाहेब पाटील (दगाबाज) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते दोघेही पोलिस मुख्यालयातील कोर्ट कंपनीत नेमणुकीस आहेत. हा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी घडला होता. डगळे आणि पाटील यांना ३ नोव्हेंबर रोजी येरवडा कारागृहातून आरोपीला बाहेर काढून न्यायालयात हजर करण्याबाबतचा आदेश देण्यात आला होता. मागणीपत्रात केवळ एकाच आरोपीचा उलेख करण्यात आला होता. त्यांना केवळ एका आरोपीला येरवडा जेलमधून बाहेर आणण्यास नेमले असताना त्यांनी येरवडा जेलमधून विशाल शिंदे आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने कामकाज संपल्यानंतर त्यांनी विशाल शिंदे याला कोर्ट लॉकअप येथे जमा केले आणि पोलिस कर्मचारी विखे यांना वॉरंट नोंद करण्याकामी कोर्ट लॉकअप येथे पाठविले. दीपक पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांची भेट घ्यायची होती़ त्यासाठी पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील यांनी दीपक पाटील यांना खाजगी मोटारीतून  कोथरूड परिसरातील करिष्मा हाऊसिंग सोसायटीत आणले़ ही मोटार दीपक पाटील यांचा मुलगा चालवित होता. 

    दरम्यान, पोलिसांनी आरोपीला परस्पर घरी नेल्याची माहिती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी अलंकार पोलिसांना त्याची माहिती दिली. दरम्यान, याबाबतची माहिती शहर नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. अलंकार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यांनी पोलिस ठाण्यातील मार्शल डयुटीवर असलेल्या पोलिसांना करिष्मा सोसायटीमध्ये पाठविले. त्यावेळी पोलिस नाईक डगळे आणि पोलिस कर्मचारी पाटील हे आरोपी दीपक  पाटील यांच्यासह तेथे आढळून आले. त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात आणण्यात आले.  दीपक पाटील याच्याविरूध्द चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात  फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

   पोलिस नाईक डगळे आणि पोलिस नाईक पाटील यांनी केलेले हे कृत्य पोलिस खात्यास शोभनीय नसल्याने तसेच त्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करुन कर्तव्यामध्ये कसूर करून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालयyerwada jailयेरवडा जेल