शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गांजा आणण्यासाठी घातला महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा गणवेश; नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:49 IST

लॉकडाऊन वाढविल्याने व्यसनाधीन लोकांची मोठी 'गोची'  

ठळक मुद्देदोन महाभागांना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा गणवेश घालून गांजा नेताना अटक

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन केला आहे. अशातच राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने व्यसनाधीन लोकांची मोठी 'गोची' झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही तळीरामांनी तर चक्क दारूची दुकानेच फोडून दारूच्या बाटल्या चोरून नेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. अशातच पुण्यातील खडकवासला भागात दोन महाभागांनी शक्कल लढवित महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा गणवेश घालून गांजा घेऊन जाताना पोलिसांनी पकडले आहे . याप्रकरणी हवेली पोलिसांनी ऋषी रवींद्र मोरे (वय : २० वर्षे, तावरे कॉलनी, पर्वती, पुणे) व  सागर चंद्रकांत सुर्वे (वय: २५ वर्षे, शिवदर्शन, पर्वती, पुणे) या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  

संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे व्यसनी लोकांना सध्या कोणताच मादक पदार्थ मिळत नाही. परंतु संचारबंदीच्या काळात पोलिसांनी अडवू नये म्हणून दोन महाभागांनी ह्यावर अनोखी शक्कल लढवली. महापालिकेच्या मयत झालेल्या कर्मचाऱ्याचा गणवेश एकाकडे होता. त्याने तो गणवेश स्वत:च्या मापाचा करून घेतला,आणि हाच गणवेश घालून हा पठ्ठ्या मित्रासह गांजा आणण्यासाठी खडकवासला येथे गेला. खडकवासला येथे हवेली पोलिसांच्या वतीने नाकाबंदी सुरु आहे. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्ही महापालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना त्यांच्या बोलण्याचा संशय आल्याने त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळला. दोघांकडून एकवीसशे रुपयाचा गांजा जप्त केला. शहरात संचारबंदी आहे तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी करीत असताना गुंगीकारक,मादक औषधे आणि मानसिक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ दोघांजवळ आढळल्याने हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. पर्वती परिसरातील पाच ते सहा जणांनी पैसे गोळा करून गांजा आणायला सांगितल्याचे दोघांनी सांगितले. पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक