कुकडीत दोन टक्केच साठा
By Admin | Updated: June 12, 2017 01:17 IST2017-06-12T01:17:50+5:302017-06-12T01:17:50+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सून सक्रिय झाला आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली

कुकडीत दोन टक्केच साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मॉन्सून सक्रिय झाला आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली; मात्र कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या दोन्ही तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. सर्व धरणे मिळून अवघे ७२८ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सर्व धरणांमध्ये फक्त २.३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी ही, तर आंबेगाव तालुक्यात डिंभा हे धरण आहे. १ जूनपासून जुन्नर तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे; मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढलेली नाही. पाच धरणांमध्ये अवघे ७२८ द.श.घ.फूट उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी आज दिवसाअखेर फक्त २८५ द.श.घ.फूट पाणीसाठा (०.८४ टक्के) उपलब्ध होता. सर्व धरणांपैकी पिंपळगाव जोगा धरणातील ० टक्के झाला आहे; परंतु या धरणात ४५५ द.ल.घ.फूट पाणीसाठा मृत साठा असल्याने
हा साठा तालुक्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.