शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जबरी चोरी करत ओला कॅब चालकाचा खून केल्याप्रकरणी दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:52 IST

जबरी चोरी करून ओला कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी फरारी असलेल्या दोन आरोपींना अटक केली... 

तळेगाव दाभाडे :जबरी चोरी करून ओला कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी फरारी असलेल्या दोन आरोपींच्या पिंपरी -चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली. वैभव उर्फ पिंटू धनराज बिजेवार (वय ३३, रा. हनुमान गल्ली, नागपूर) आणि दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय २५, रा. मोशी, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक(गुन्हे)भानुदास जाधव यांनी दिली.या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.खून प्रकरणातील वैभव आणि दिगंबर या आरोपींना मोठया शिताफीने नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून २ देशी बनावटीचे गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे आणि एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.इंदोरी - जांबवडे रस्त्यावरील पवार शेतीजवळ रस्त्याच्या कडेला  ज्ञानेश्वर किसन वरबडे (वय २रा.बालघरे वस्ती, कुदळवाडी ,चिखली) या तरुणाचा गोळ्या घालून निर्घृण करण्यात आला होता.खुनाचा हा प्रकार मंगळवारी सकाळी (२१मे)उघडकीस आला.यासंदर्भात इंदोरीचे पोलीस पाटील जयदत्त शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली होती.या खून प्रकरणाने मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती.

नेमकी घडलेली गटना काय....ज्ञानेश्वर हा ओला कॅब चालविण्याचे काम करत होता. २० मे रोजी वैभव आणि दिगंबर यांनी ज्ञानेश्वर याची कॅब बुक केली. बराच वेळ दोघांनी कॅब फिरवली. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी - जांबवडे रस्त्यावर दोघांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात आणि पोटात गोळ्या घालून खून केला. आरोपींनी ज्ञानेश्वरचे एटीएम कार्ड आणि कार घेऊन पोबारा केला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताची ओळख पटवणे आणि त्याचे मारेकरी शोधणे हे एक पोलीस यंत्रणेपुढे आव्हान होते.पोलीस यंत्रणेपुढे एक आव्हान होते.          या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस संयुक्तरित्या करीत होते. तांत्रिक आणि अन्य मुद्द्यांचा तपास घेत पोलिसांनी ज्ञानेश्वरची ओळख पटवली. तो ओला कॅब चालविण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना त्याची ओला कॅब खेड तालुक्यातील सावदरी येथे मिळाली. कॅबमधील बुकिंग टॅबलेटच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.       आरोपींना अटक   वैभव आणि दिगंबर हे खून केल्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर नागपूर येथे गेल्याचे पोलिसांना तांत्रिक तपासात आढळले. दरम्यान त्यांनी ज्ञानेश्वर याच्या एटीएममधून १३ हजार ५०० रुपये काढून घेतले. गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे संयुक्त पथक नागपूरला तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी दोघांना नागपूर मधून ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकू जप्त केला. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.    ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) भानुदास जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे,तळेगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, पोलीस कर्मचारी मयूर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारूक मुल्ला, प्रवीण देळे, नारायण जाधव, संदीप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुषार शेटे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनArrestअटक