चंदननगर: खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना घडली. हे युवक रस्त्यावरुन जाणारे युवक व युवती गंभीर जखमी झाले. खराडी ते ईआॅन आयटी पार्क रस्त्यावरील खराडी एमआयडी रस्त्यावर कंपनीचा मोठा ट्रॉन्सफार्मर आहे. त्याचा शुक्रवारी साडेचारच्या दरम्यान अचानक स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमींची नावे प्रियंका झगडे तर पंकज खुणे असुन या दोघांवर खराडीतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी अग्निशमन दल व चंदननगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत ट्रान्सफॉर्मर जळुन खाक झाला होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आली. आग लागल्यामुळे रस्त्यावरील वाहतुक एकतासासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सदर घटनेतील जखमी युवक आणि युवती हे झेन्सार आयटीपार्कमधील कंपनीत नोकरीला आहे.
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:41 IST
खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना घडली.
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी
ठळक मुद्देसदर घटनेतील जखमी युवक आणि युवती हे झेन्सार आयटीपार्कमधील कंपनीत नोकरीला