शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:44 IST

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे स्टॅन्ड येथे रस्ता ओलांडत असताना वाळू वाहतूक करणा-या ट्रकची जोरात धडक बसल्याने ३८ वर्षीय व्यक्ती ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री आठच्या वेळेला घडली. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळे स्टॅन्ड येथे नगर-कल्याण महामार्ग रस्ता आळे येथील दत्तात्रय भीमाजी डोके (वय ३८) हे रस्ता ओलंडत होते. याचवेळी ...

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे स्टॅन्ड येथे रस्ता ओलांडत असताना वाळू वाहतूक करणा-या ट्रकची जोरात धडक बसल्याने ३८ वर्षीय व्यक्ती ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री आठच्या वेळेला घडली. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळे स्टॅन्ड येथे नगर-कल्याण महामार्ग रस्ता आळे येथील दत्तात्रय भीमाजी डोके (वय ३८) हे रस्ता ओलंडत होते. याचवेळी बेल्हा बाजुने तेथे वाळू भरलेल्या हायवा ट्रकची त्यांना जोरात धडक बसली. या अपघातात दत्तात्रय डोके गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

राजेंद्र विठ्ठल डोके यांचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांत ट्रक चालकाचे विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे पोलिस निरीक्षक गणेश ऊगले यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार

नारायणगाव : रास्ता ओलांडताना वाहनांची धडक बसल्याने अज्ञात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर वारूळवाडी हद्दीत घडली. वारूळवाडी हद्दीतील वैष्णवी हॉटेल समोर हा अपघात रात्री आठच्या सुमारास झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, होंडा कंपनीची कार (एमएच. १७, बीव्ही ४२६०) ही पुण्याकडे जात होती. रस्ता ओलांडून जात असणाऱ्या ६५ ते ७० वर्षीय वृद्धेला वाहनाची जोराने धडक बसल्याने ती जागीच ठार झाली. मृत वृद्धेच्या डाव्या हाताच्या पंजावर फुलांचे गोंदण, मनगटाच्या आतील बाजूस विठ्ठल रखुमाईचे चित्र व फुले असून उजव्या हाताच्या पंजावर फुलांचे गोंदण ,मनगटाच्या पाठीमागे नाथ ,बारकू , मारुती अशी नावे गोंदली आहेत. केस पिकलेले असून अंगात लाल साडी व लाल रंगाचा ब्लाउज ,गळ्यात पांढºया धाग्यांमध्ये काळ्या मण्याची पोत आहे. वृद्धेसंदर्भात माहिती असल्यास नारायणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात