शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीची भिंत पडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:58 IST

ही घटना मोशी येथील तापकीरनगर येथे साईकृपा कॉलनीमध्ये घडली...

पिंपरी : बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरू असताना भिंतीचा काही भाग बाजूला असलेल्या सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीवर कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. ही घटना मोशी येथील तापकीरनगर येथे साईकृपा कॉलनीमध्ये गुरूवारी (दि. १५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

उत्तम नारायण मोरे (वय ३३, रा. साई कॉलनी, तापकीरनगर, मोशी) आणि मेहबूब (वय ३०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृपा कॉलनीमध्ये तात्याराव बाबुराव जाधव यांचे घर आहे. या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. गुरूवारी भिंतीचे प्लास्टर सुरू होते.

यावेळी अचानक भिंतीचा काही भाग कोसळला. ही भिंत बाजूला असलेल्या एका खोलीच्या सिमेंटच्या पत्र्यावर पडली. यावेळी उत्तम आणि मेहबूब यांच्यासह आणखी दोन जण खोलीत बसले होते. भिंत पडून जखमी झाल्याने उत्तम आणि मेहबूब यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेmoshiमोशीAccidentअपघात