शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:55 IST

मॉलिश ऑईल खरेदी करण्याचे नावाखाली वेळोवेळी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात एकूण ३१ लाख ४२ हजार रुपये घेतले़...

पुणे : औषधी ऑईल विक्री करुन मोठा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून ३१ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना सायबर पोलिसांनी मुंबईहून अटक केली आहे़. हेन्री चिकाडिबिया झिऑन(वय ३५) आणि एकी इसेन इफिआंग (वय २५, दोघे रा़. पलावा सिटी, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, जि ठाणे) अशी या जोडप्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी हडपसर येथील एका रियल इस्टेट एजंटला मोबाईलवरुन तसेच ई-मेलद्वारे संपर्क साधून आमच्या गोल्डरेर कॉस्मेटिक या कंपनीमध्ये प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लागणारे अ‍ॅकॅन्थस मॉलिश ऑईल हे भारतामध्ये स्वस्त दरात मिळते़. आम्ही शेतकऱ्यांकडून प्रति लिटर १ लाख ४२ हजार रुपये दराने विकत घेतो़. ते आमची कंपनी २ लाख ४८ हजार रुपये दराने विकत घेते़. या ऑईलच्या खरेदी करण्याबाबत त्यांच्या कंपनीला भारतामधील प्रतिनिधी म्हणून काम करावे, असे त्यांनी या इस्टेट एजंटला सांगितले़. मध्यस्थाचे काम करण्याबाबत व त्याद्वारे भरपूर नफा मिळण्याचे आमिष त्यांना दिले गेले़. तसेच या होणाऱ्या नफ्यामधील ४० टक्के रक्कम कमिशन म्हणून द्यावी, अशी मागणी केली़. त्यासाठी मॉलिश ऑईल खरेदी करण्याचे नावाखाली वेळोवेळी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात एकूण ३१ लाख ४२ हजार रुपये घेतले़. त्यानंतर पुढे काही न झाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी सायबर पोलिसांनी १२ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता़. या गुन्ह्यातील मोबाईल व ई मेलचा तांत्रिक अभ्यास करुन विश्लेषण केल्यावर दोघेही संशयित हे डोंबिवलीमध्ये रहात असल्याचे आढळून आले़. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस शिपाई नितेश शेलार, अनुप पंडीत, ज्योती दिवाणे या पथकाने डोंबिवलीमध्ये त्यांच्या शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले़ ते राहत असलेल्या फ्लॅटच्या झडतीमध्ये १ लॅपटॉप, ११ मोबाईल, १ इंटरनेट राऊटर, १ डोंगल तसेच २ डेबीड कार्ड, १ ओळखपत्र, ५ हजार ५२० रुपये असा माल हस्तगत करण्यात आला आहे़. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़  पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस