शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

काळू धबधब्यात वाहून चाललेल्या मुंबईच्या दोन पर्यटकांना वाचवले; शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:31 IST

२० ते २५ वयोगटाच्या ४ तरूणी व १ तरूण हे धोकादायक पद्धतीने पाणाच्या मुख्य प्रवाहात उतरले होते.

जुन्नर : माळशेज घाटात खिरेश्वर (ता.जुन्नर) व थितबी (ता.मुरबाड) यादरम्यान कोसळणाऱ्या काळू धबधब्यात वाहून चाललेल्या मुंबईच्या दोन पर्यटकांना वाचविण्यात येथील शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांना नुकतेच यश आले. 

सुट्ट्यांच्या दिवशी काळू धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी अपघातही नित्याचे झाले आहेत. नुकताच मुंबईतील एका तरुणाचा या धबधब्यात पडून मृत्यू झाला. घटनास्थळावरून बऱ्याच अंतरावर काळू नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेला चार दिवस उलटायच्या आतच हा प्रकार निदर्शनास आल्याने पावसाळी पर्यटनातील पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुशंगाने शासकीय यंत्रणांची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

३१ जुलै २०२२ रोजी शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य व मंगरूळ पारगाव येथील रहिवासी सागर चव्हाण, अतुल रसाळ, स्वप्नील तट्टू  हे या काळू धबधब्याच्या परिसरात सेफ्टी केबल लावण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. काळू धबधब्याचे ३ प्रमुख टप्पे आहेत. यातील सर्वात खालच्या टप्प्यात रविवारी दुपारी सुमारे ५० पर्यटक पावसाळी सहलीला आले होते. यापैकी २० ते २५ वयोगटाच्या ४ तरूणी व १ तरूण हे धोकादायक पद्धतीने पाणाच्या मुख्य प्रवाहात उतरले होते. 

या ठिकाणी सुरक्षात्मिक बाबींच्या अनुषंगाने पहाणीस गेलेल्या शिवनेरी ट्रेकर्सच्या या पथकाने त्यांना वारंवार गांभिर्याचा इशारा देऊनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. पाण्यातील शेवाळल्या दगडावरून पाय घसरून त्यातील एक तरुण व एक तरुणी वाहून जाऊ लागले. त्यांनी वाहताना आरडाओरडा केला. यावेळी प्रसंगावधान दाखवत शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य सागर चव्हाण, अतुल रसाळ व स्वप्नील तट्टू यांनी या दोघांना धबधब्यात पाणी कोसळण्याच्या जागेपासून अवघ्या काही फुटांवर सुरक्षितपणे बाहेर काढले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीtourismपर्यटनSocialसामाजिक