शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडाप्रकरणी आणखी दोघे मुंबईतून ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 8:14 PM

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे.

ठळक मुद्देमुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार

पुणे : कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला आहे. नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय ३४, साईकृपा अपार्मेंट, नारंगी रस्ता, विरार. मुळ रा. कुलीना टुकुरा, जि. बरगर ओरिसा) आणि मोहम्मद सईद ईक्बाल हूसेन जाफरी उर्फ अली (वय ३०, रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे. याप्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. त्यामुळे आता एकूण अटक आरोपींची संस्था ६ झाली आहे. यापुर्वी शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, धावरीतांडा, नांदेड), फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जब्बार आणि रोठोड यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे.    बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने विविध भागातील सर्व आरोपी कोल्हापूर येथे आले. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याची घटना ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. चैत्राली पणशीकर यांनी केली होती. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिस