खडकी : घरात शिरून दोन अल्पवयीन मुलींशी अश्लिल चाळे करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका पुजाऱ्याला खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. केले. हेमंत उर्फ तात्या रामचंद्र काटेकर (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर आई वडिलांना ठार मारणार असल्याची धमकी देत अनेक दिवसांपासून सात वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण करत होता. या बालिकेच्या घरी आलेल्या ११ वर्षांच्या पाहुण्या मुलींशीही त्याने गैरवर्तन केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीविरोधात विनयभंग आणि बाललैगिंक अत्याचार कायद्यानुसार खडकीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा खडकी बाजारातील एका मंदिरात २० वर्षांपासून पुजारी म्हणुन काम करत आहे. मंदिरातील पुजारी म्हणुन परिसरातील नागरिक त्याच्याकडे सज्जन गृहस्थ या नजरेतून पाहत होते. मात्र. त्याची दुष्कृत्य उघड झाल्याने त्याच्याविषयी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या महिन्यात २६ एप्रिलला हा पुजारी मंदिराची चावी ठेवण्यासाठी जवळच्या एका घरात गेला असताना या घरात वरच्या मजल्यावरील खोलीत दोन लहान मुली खेळत होत्या. त्या मुलींशी गैरवर्तन केले. सात वर्षाच्या मुलीशी आरोपी नेहमीच असे गैरकृत्य करत होता. मात्र. त्यादिवशी फिर्यादी महिलेच्या नणंदेची मुलगी त्यांच्याकडे आली होती. तिच्यासोबतही त्याने गैरवर्तन केले. सात आणि ११ वर्षाच्या या दोन मुलींनी घडल्या प्रकाराबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. काही दिवसांपुर्वी या दोन्ही मुली सांगवीतील नातेवाईकांकडे गेल्या. खेळत असताना तात्या आपल्या आई वडिलांना मारेल, असे सहज बोलुन गेल्या. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मुलींना असे कोणी धमकावले, याची अधिक माहिती घेतली असता, काही महिन्यांपासून आरोपी सात वर्षाच्या मुलीला त्रस्त करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरिक्षक वैशाली अजगवेकर याप्रकरणी तपास करीत आहेत.
खडकीत पुजाऱ्याकडून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:11 IST
खडकी येथील एका मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली
खडकीत पुजाऱ्याकडून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
ठळक मुद्देदोन्ही मुली नातेवाईकांकडे आल्या असता हा प्रकार समोर आला आई वडिलांना ठार मारणार असल्याची धमकी देत अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण