पिंपरी : दापोडी येथे एका इसमाला परदेशी डॉलर देतो असे सांगून चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २२ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दापोडी येथील काटे बंगल्या समोरील भोसले कंट्री बार येथे घडली. विक्रम शर्मा (वय २७, रा. विमाननगर, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रफिक हलिम हुसेन (वय २७), मोहम्मद दिलावर मोहम्मद शहा शेख (वय २५, दोघेही रा. नजीर गल्ली, येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोघे आरोपी फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांना फोनवर दोन अनोळखी इसमांनी तुम्हाला परदेशी डॉलर देतो असे सांगून दापोडी मधील कंट्री बार येथे बोलावून घेतले. तसेच त्यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना परदेशी डॉलर न देता त्यांना चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केली. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
परदेशी डॉलरच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 19:24 IST
दापोडी येथे एका इसमाला परदेशी डॉलर देतो असे सांगून चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
परदेशी डॉलरच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा
ठळक मुद्देपरदेशी डॉलर देतो असे सांगून चक्क कागदाचा बंडल देऊन फसवणूक