दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:21 IST2018-05-10T02:21:55+5:302018-05-10T02:21:55+5:30

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.

two killed in Road Accident | दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी रात्री बारा वाजून ५० मिनिटांनी झाला. अक्षय ऊर्फ बंटी संजय गारगोटे ( वय २४, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) व अंकुश कन्हैयालाल अगरवाल ( वय २१, रा. नेहरू चौक, राजगुरूनगर, ता.खेड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून चाकणकडून खेड बाजूकडे जात असताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. जखमींना जागेवर सोडून खबर न देता वाहनचालक पळून गेला.
अमोल दामोदर गारगोटे ( वय २६, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: two killed in Road Accident