शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

लोणावळ्यात पिकअप जीपला भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यूतर २५ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 00:05 IST

Accident News: अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोणावळा :  अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वलवण पुलाजवळ झाला आहे.

पिकअप वाहन चालक संदिप ज्ञानेदव भालके (वय-41, रा. कोठे बुद्रुक, सगमंनेर,अहमदनगर) व दिपक सुभाष कडाळे (वय-18, रा.पिंपळदरी, अकोले, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये अक्षय पंढरी कडाळे, अजय भाऊसाहेब कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय शिवाजी मेंगाळ, रेवन कडाळे, अवदुत मधे, अर्जुन कडाळे, करण कडाळे, संतोष पारधी, विलास कडाळे, प्रविण दिंगबर भगत, विजय ज्ञानदेव कडाळे, ओंमकार प्रकाष कडाळे, लक्ष्मी कुंडलीक कडाळे, रेश्मा पारधी, काजल कडाळे (सर्व रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर), अमोल सावळेराम दुधवडे (रा. करजुले पठार,संगमनेर, अहमदनगर) करण सुदाम उघडे (वय-19, व रा.गुंजाळवाडी, संगमनेर, अहमदनगर) तसेच इतर पाच महीला व पाच  लहान मुले (पुर्ण नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील पिंपळदरी व परिसरातील भाविक हे अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देवदर्शनासाठी पिकअप वाहनाने (क्रमांक- एमएच-14/जीयु-9227) जात होते. मंगळवारी पहाटे अडीच सुमारास भरधाव वेगात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी लोणावळ्यातील वलवण गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली.

या भीषण घडकेत वाहन चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे 25 भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये 15 जण गंभीर तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस व मार्गावरील देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमींना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल व  काहींना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlonavalaलोणावळा