शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन किलोचा मुळा पाहिलाय? पुण्यातील आंबेठाण येथील शेतकऱ्याने घेतले यशस्वी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:08 IST

ड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...!

ठळक मुद्देपडवळ यांनी तीन गुंठे क्षेत्रात महिको जातीचे बियाणे वापरून घेतले मुळा पीकमुळा साधारण दोन किलो वजनाचा व दीड फूट लांब असल्याचे आले दिसून

आंबेठाण : थंड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...!प्रामुख्याने रब्बी घेतल्या जाणाऱ्या मुळ्याचे पडवळ यांनी आपल्या तीन गुंठे क्षेत्रात पीक घेतले आहे. त्यांना मुळ्याचे उत्पादन भरघोस मिळत आहे, यात दोन किलो वजनाचा मुळा सापडला असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाढत्या औद्योगिक भागामुळे नागरीकरण मोठ्या संख्येने वाढले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकविण्याकडे कल वाढला आहे. पडवळ यांनी आपल्या शेतातील तीन गुंठे क्षेत्रात महिको जातीचे बियाणे वापरून मुळा पीक घेतले आहे. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. सध्या मुळा काढणी सुरू आहे, काढणी सुरू असताना एकच मुळा जमिनीत खोलवर गेलेला दिसून आल्याने पडवळ यांनी त्याला व्यवस्थित उकरून बाहेर काढला असता, मुळा साधारण दोन किलो वजनाचा व दीड फूट लांब असल्याचे दिसून आले. आजपर्यंत काढणी झालेल्या मुळ्यामध्ये एकच मुळा एवढा मोठा सापडल्याने पडवळ कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले आहे. गावामधील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.मुळ्याची जमिनीतील वाढ चांगली होण्यासाठी भुसभुशीत जमिनीची निवड केली. भारी जमिनीची चांगली मशागत केल्याने मुळ्याचा आकार वेडावाकडा न होता, पांढरा व सरळ असल्याने बाजारात मागणी चांगली आहे. मुळा लागवड केल्यावर त्याला ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन, पीकही भरघोस आल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे. तीन मुळ्यांच्या एका गड्डीला दहा रुपये मिळत आहेत. बाजारात विक्री न करता किरकोळ विक्रीतून चांगले पैसे मिळत आहेत. तीन गुंठे क्षेत्रात साधारण खर्च वजा जाता सात हजार रुपये फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी