शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विजापूरला अपघात, दोघा कबड्डीपटूंचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:49 IST

मंगळवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब येथील संघातील १३ कबड्डीपटू एका स्पर्धेसाठी विजापूरच्या दिशेने निघाले होते. महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, आविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे आदींचा यामध्ये समावेश होता.

वालचंदनगर (जि. पुणे) : कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडूंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. रनिहला क्रॉसजवळ (ता. कोल्हारा) समोरून आलेल्या कंटेनरची व तवेराची टक्कर झाली. या गंभीर अपघातात महादेव आवटे व सोहेल सय्यद या कबड्डीपटूंचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी कळंब येथील संघातील १३ कबड्डीपटू एका स्पर्धेसाठी विजापूरच्या दिशेने निघाले होते. महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, आविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे आदींचा यामध्ये समावेश होता. पहाटे पाचच्या सुमारास त्यांची गाडी व कंटेनरची टक्कर झाल्याने गाडीमधील समोर बसलेले महादेव आवटे व सोहेल सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक वैभव मोहिते व गणेश कोळी यांना गंभीर दुखापत झाली आहे.सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कबड्डीच्या माध्यमातून या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर गावाचा नावलौकिक वाढवला आहे. कळंबमधून तातडीने ग्रामस्थ विजापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिद्ध आहे. येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघातून अनेक राष्ट्रीय कबड्डीपटू घडले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेKabaddiकबड्डीAccidentअपघात