शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune: शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू ; एक पादचारी जखमी

By नम्रता फडणीस | Updated: July 23, 2024 16:29 IST

हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी बाजारमळा गावात घरासमोर अंगणात थांबलेल्या ज्येष्ठ महिलेला कारने धडक दिली

पुणे : शहरात अपघाताचे सत्र कायम आहे. लोणी काळभोर भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. हडपसर-सासवड रस्त्यावरील  वडकी बाजारमळा गावात घरासमोर अंगणात थांबलेल्या ज्येष्ठ महिलेला कारने धडक दिली. शांताबाई केरबा मोडक (वय ७३, रा. वडकी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. माेडक या दि. ३ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या मोडक यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

दुसरी अपघाताची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली.  भरधाव टेम्पोने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक महेश करे यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.   मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालक प्रीतवर्धन दिवाकर शर्मा (वय २४, रा. गोदरेज सोसायटी, हिंजवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष शेंडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यूSenior Citizenज्येष्ठ नागरिक