शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पुरंदर तालुक्यात जागेच्या वादातून दोन गटांत दगडफेक व जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:39 IST

पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे जागेच्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक व जाळपोळ झाली. यात जीवितहानी झाली नसली तरी दगडफेक व जाळपोळीमुळे सुमारे सात-आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.  जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव मेमाणे चौफुला येथे दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे यांचे हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलसमोरील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली होती. हॉटेलसमोरील जागा त्यांच्या मालकीची नसल्याने राजेंद्र पान शॉपचे मालक राजेंद्र साहेबराव मेमाणे यांनी हरकत घेतली होती. त्यांचा हा वाद अनेक महिन्यांपासूनचा आहे. जेजुरी पोलिसांनी यापूर्वीही या दोघांना ताकीद देऊन कायदेशीर मार्गाने जमिनीचा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना दिली होती. मात्र, काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हॉटेलसमोरील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली. याला राजेंद्र मेमाणे यांनी पुन्हा हरकत घेतली. यावरून वादाला तोंड फुटले. दत्तात्रय मेमाणे यांनी त्यांचे बाहेरून नातेवाईक बोलावून राजेंद्र मेमाणे यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मेमाणे यांनी ही ग्रामस्थांना व भावकीतील लोकांना बोलावले. वातावरण आणखीच तापल्याने त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. जाळपोळ करण्यासही सुरुवात झाली. यात सावली हॉटेलची तोडफोड करण्यात आली. हॉटेलच्या इमारतीतील किराणा दुकान आणि एक दुचाकी पेटवून देण्यात आली. दुकानातील माल व दुचाकी संपूर्ण जाळून खाक झाले. तसेच तीन दुचाकी, एक अल्टो कार व जेसीबीचे दगडफेकीमुळे तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.                          दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे आणि राजेंद्र साहेबराव मेमाणे यांनी एकमेकांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. जेजुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात कोणीही जखमी नाही. मात्र मालमत्ता व गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेमाणे यांच्या फिर्यादीनुसार दत्तात्रय बाबासाहेब मेमाणे, श्रीकांत बापूसाहेब मेमाणे, गणेश किसन मेमाणे (तिघेही रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर), मंगेश ऊर्फ मोन्या अशोक कानकाटे, कृष्णा यशवंत खेडेकर (दोघेही रा. उरुळीकांचन, ता. हवेली), योगेश ऊर्फ सोन्या शामराव कुंजीर (रा. भेकराईनगर, हडपसर), केतन विष्णू मोकाशी (रा. भिवडी, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे, तर दत्तात्रय मेमाणे यांनीही राजेंद्र साहेबराव मेमाणे, सुभाष गोविंद मेमाणे, गणेश रघुनाथ मेमाणे आदीं  व्यक्तींविरोधात(सर्वजण रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.     पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या १७ आरोपींना आज सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील अधिक तपास करत आहेत.         

टॅग्स :JejuriजेजुरीPurandarपुरंदरCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक