शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वाराच्या बांधकामाचा हिशोब मागितल्यावरुन दोन गटात हाणामारी; एकाच्या खुनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:59 IST

वानवडी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ हून अधिक जणांवर केला गुन्हा दाखल; ६ जणांना अटक

पुणे : गुरुद्वाराच्या बांधकामाच्या हिशोब मागितल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य ६ जण जखमी झाले आहेत. वानवडी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ९ जणांना अटक केली आहे. ही घटना रामटेकडी येथील कलगीधर गुरुद्वारा येथे बुधवारी दुपारी घडली.

याप्रकरणी कृष्णासिंग कल्याणी (वय ३०, रा. थेऊरगाव, ता. हवेली) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३०, रा. सोरतापवाडी, कुंजीरवाडी), नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७२), हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय २८), तपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४७) आणि जगपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ४२) यांना अटक केली असून अन्य व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रामटेकडी येथे कलगीधर गुरूद्वाराचे बांधकाम सुरू असून त्यासंबंधित बुधवारी दुपारी १२ वाजता गुरूद्वारामध्ये बैठक सुरू होती. फिर्यादी, त्यांचा भाऊ, वडील व पुतण्या संबंधित गुरूद्वारा कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी गुरूद्वारा केलेल्या बांधकामाचा कमिटीला हिशोब मागितला. त्यावेळी फिर्यादी व आरोपींमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर हरपालसिंग कल्याणी याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचा पुतण्या जसविंदरसिंग गळ्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी लाकडी दांडक्‍याने, लोखंडी सळईने फिर्यादी, त्यांचे वडील, भाऊ व पुतण्याला मारहाण करीत जखमी केले.

याप्रकरणी दुसर्या गटातील नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७०, रा. सोरतापवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जलसिंग धारासिंग कल्याणी (वय ३८), कृष्णासिंग धारासिंग कल्याणी (वय ३७) व हिम्मतसिंग धारासिंग कल्याणी (वय २९) यांना अटक केली असून इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांच्या कमिटीचे सदस्य धारासिंगच्या घराच्या बाजुला असलेली गुरूद्वाराची भिंत त्याच्या परवानगीशिवाय बांधण्याबाबत चर्चा करीत होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादी समवेत असलेले त्यांचे कुटुंबीय जसपालसिंग, हरपालसिंग यांना आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ते पळुन जाताना त्यांच्यावर दगडफेक केली. तर जलसिंग याने गाडीतून तलवार काढून नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली. दोन्ही गुन्ह्यांमधील सहा ते आठ आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक