शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

दोन गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले करत माजवली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 18:41 IST

सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची दिली धमकी

ठळक मुद्देखुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले. गंगानगर, आकुर्डी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटातील १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात रोशन छबुराव काळे (वय ३४, रा आकुर्डी) यांनी बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजी सातपुते, योगेश मानकेरे, श्रेयस टाकळकर, रोहित ओवाळ, आदित्य यादव, शुभम दत्तात्रय जाधव आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सातपुते आणि मानकेरे हे दोघेजण गंगाई उद्यानात नशापान करत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यास हटकले. तसेच शनिवारी  झालेल्या वादात मध्यस्थी केली. या रागातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या प्रकरणात शुभम दत्तात्रय जाधव (वय २१, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भूषण काळे, रोशन काळे, साहिल काळे, सागर कान्हूरकर, राहूल कान्हूरकर, प्रदीप गुजर, (सर्व रा. आकुर्डी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शतपावली करण्यासाठी फिर्यादी घराबाहेर आले. फिर्यादीचा मित्र श्रेयसने केलेल्या भांडणाच्या कारणावरून तसेच श्रेयस व इतर मित्र फिर्यादीसोबत असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस