दौंड परिसरात दोन गव्यांचा शिरकाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 12:03 IST2022-01-12T11:48:46+5:302022-01-12T12:03:20+5:30
दौंड: दौंड शहरात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचच्या परिसरात दोन गवे दिसून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ...

दौंड परिसरात दोन गव्यांचा शिरकाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दौंड: दौंड शहरात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचच्या परिसरात दोन गवे दिसून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हे गवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्द्यानापर्यंत आले आहेत. वन विभागाने या दोन गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे आली आहे.
मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गोपाळवाडी रोडकडून राज्य राखीव पोलीस बल क्रमांक पाचच्या परिसरात सी.ओ. बंगल्याच्या पाठीमागे दोन गवे आले. यावेळी रात्री गस्तीवर असलेल्या जवानांनी दोन्ही गवे बघितल्याने जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान काही वेळानंतर हे गवे दौंड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले. शहरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.