टोळक्याकडून दोघांवर हल्ला

By Admin | Updated: December 26, 2016 03:25 IST2016-12-26T03:25:52+5:302016-12-26T03:25:52+5:30

किरकोळ कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या

Two from the gang attacked | टोळक्याकडून दोघांवर हल्ला

टोळक्याकडून दोघांवर हल्ला

पिंपरी : किरकोळ कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथील ओटास्कीम झोपडपट्टीतील आझाद चौकाजवळील संग्रामनगर येथे घडली.
रजनीकांत उत्तम क्षीरसागर (वय ४८) आणि अमित अप्पासाहेब गोरे (वय २२, दोघे रा. ओटा स्कीम, निगडी) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हौसराव शिंदे, बाळा बरगले, सागर शिंदे, राजू शिंदे, उमेश आव्हाड, विशाल झेंडे (सर्व रा. ओटास्कीम झोपडपट्टी, निगडी) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रतीलाल उत्तम क्षीरसागर (वय ४६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निगडी, ओटास्कीम येथील रहिवाशांच्या मुलाखती रविवारी एक वृत्तवाहिनी घेत होती. त्या वेळी आरोपी आणि रजनीकांत क्षीरसागर हे दोघेही तिथे होते. दरम्यान, आरोपी हौसराव याने आणि त्याच्या साथीदाराने रजनीकांत यांना शिवीगाळ केली. रजनीकांत हे दुसऱ्या इमारतीकडे जात होते. त्या वेळी आरोपी मोटारीतून तिथे आले. या घटनेनंतर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Two from the gang attacked