तळेगाव ढमढेरेत जुगार खेळणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST2021-09-23T04:13:00+5:302021-09-23T04:13:00+5:30

विकास आनंद शिरोळे (वय २२, रा. चिमणापीर मळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) व प्रशांत भगवान चव्हाण (२६, ...

Two gamblers arrested in Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरेत जुगार खेळणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

तळेगाव ढमढेरेत जुगार खेळणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

विकास आनंद शिरोळे (वय २२, रा. चिमणापीर मळा तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) व प्रशांत भगवान चव्हाण (२६, रा. वसू मळा कासारी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, तळेगाव ढमढेरे येथील गीताई हॉटेलच्या पाठीमागे काही व्यक्ती जुगाराचे साहित्य जवळ बाळगून जुगार व सोरेट खेळत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलीस नाईक अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, गणेश सुतार, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, विकास मोरे यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत कारवाई करीत जुगार खेळणाऱ्या दोघांना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य जप्त करीत कारवाई केली.

याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किशोर उत्तम शिवणकर यांनी फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी विकास आनंद शिरोळे, प्रशांत भगवान चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल दांडगे हे करीत आहे.

Web Title: Two gamblers arrested in Talegaon Dhamdhere