शिवणे परिसरात दोन सदनिका फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:40+5:302021-09-11T04:11:40+5:30

पुणे : शिवणे परिसरातील एका सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस ...

Two flats were blown up in Shivne area | शिवणे परिसरात दोन सदनिका फोडल्या

शिवणे परिसरात दोन सदनिका फोडल्या

पुणे : शिवणे परिसरातील एका सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेतीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत दीपक पायगुडे (वय ५०, रा. श्री कॉम्प्लेक्स, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायगुडे यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी मध्यरात्री सोसायटीत प्रवेश केला. पायगुडे यांच्या सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी कपाटातील एक लाख १२ हजारांची रोकड आणि दागिने असा ३ लाख ४९ हजारांचा ऐवज लांबविला. याच सोसायटीतील आणखी एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन हजारांची रोकड लांबविली. सोसायटीच्या आवारातील एका इमारतीतील खासगी कार्यालयाच्या दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करत आहेत.

---

Web Title: Two flats were blown up in Shivne area